पिरंगुट ग्रामपंचायतीत
आपले स्वागत आहे“सशक्त ग्राम – समृद्ध पिरंगुट” हेच आमचे ध्येय वाक्य आहे
पिरंगुट हे मुळशी तालुक्यातील एक ऐतिहासिक, औद्योगिक व सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत गाव आहे. पुणे शहरापासून केवळ १२ किमी अंतरावर वसलेले हे गाव सन १९५६ साली अधिकृतरित्या ग्रामपंचायतीच्या स्वरूपात स्थापन झाले. मुकाईवाडी हे पिरंगुटचे महसुली गाव असून विविध जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात.
२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १५,१६३ होती, तर २०२२ पर्यंत ती वाढून सुमारे ३०,५०० झाली आहे. औद्योगिक क्षेत्र आणि बाजारपेठेमुळे येथील तरंगती लोकसंख्या सुमारे ७०,००० पेक्षा जास्त आहे.
- Young / Youth programmes
- Health & Sport
- Police & Crime






पिरंगुट ग्रामपंचायत — स्मार्ट
पिरंगुट ग्रामपंचायत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
डिजिटल सेवांद्वारे पारदर्शक प्रशासन, नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन,
तसेच शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत “स्मार्ट ग्राम” बनविण्याचा आमचा संकल्प आहे.
0+
एकूण लोकसंख्या
0
कुटुंबे
0
वार्ड संख्या
0
ग्रामपंचायत सेवक
0
ग्रामपंचायत सदस्य
पिरंगुट – स्मार्ट, स्वच्छ आणि स्वयंपूर्ण ग्राम
सुशासन, सामाजिक न्याय, आरोग्य आणि पर्यावरण यांचा समतोल राखत,
पिरंगुट ग्रामपंचायत “डिजिटल विकासा”कडे वाटचाल करत आहे.
मा श्री. देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जागर बदलाचा समृद्ध महाराष्ट्राचा
पिरंगुट ग्रामपंचायत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामविकास, डिजिटल परिवर्तन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक समता या क्षेत्रांत सातत्याने काम करत आहे.
या उपक्रमाद्वारे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
अभियानाचे मुख्य ७ घटक!
- सुशासनयुक्त पंचायत (लोकाभिमुखप्रशासन)
- सक्षमपंचायत (स्वनिधी, CSR, लोकवर्गणी)
- जलसमृद्ध, स्वच्छ व हरितगाव
- मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण
- गाव पातळी वरील संस्था सक्षमीकरण
- उपजीविका विकास व सामाजिक न्याय
- लोक सहभाग व श्रमदानातून लोक चळवळ
पिरंगुट ग्रामपंचायत – विकासाच्या आठ वाटा
सर्वांगीण प्रगती, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि डिजिटल परिवर्तनाचा आदर्श नमुना असलेले आधुनिक पिरंगुट.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणासाठी आधुनिक पद्धतीने कचरा वर्गीकरण व खतनिर्मिती करणारा आदर्श प्रकल्प.
दोन मजली नवे ग्राम सचिवालय भवन
आधुनिक सुविधा असलेले, प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणारे नव्याने उभारलेले ग्रामपंचायत भवन.
जल जीवन मिशनअंतर्गत घराघर जलपुरवठा
प्रत्येक घराला शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारी, नागरिकांच्या आरोग्याशी थेट जोडलेली योजना.
सिमेंट काँक्रीट रस्ते
टिकाऊ आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे संपूर्ण गावभर उभारलेले.
मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
स्थिर आणि शुद्ध जलपुरवठ्यासाठी मुळशी प्रादेशिक योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवला आहे.
डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम
प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांच्या सोयीसाठी सर्व सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध.
फिल्टर प्लांट व मिटर रीडिंग प्रणाली
शुद्ध पाण्याचा वापर सुनिश्चित करण्यासाठी फिल्टर प्लांट आणि अचूक बिलिंगसाठी मिटर प्रणाली कार्यान्वित.
अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन योजना
स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणासाठी संपूर्ण गावभर भूमिगत गटार व्यवस्था कार्यान्वित.
पिरंगुट ग्रामपंचायतीतील ताज्या घडामोडी
पिरंगुट गावातील ऐतिहासिक स्थळे
आमचे उपक्रम – आमचा सहभाग
Event closed.

Oct - 09 - 2025
























