श्री भैरवनाथ जोगेश्वरी माता यात्रा महोत्सव
ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी माता उत्सव
श्री भैरवनाथ जोगेश्वरी मातेचा उत्सव पिरंगुट गावात अठराव्या शतकापासून परंपरेने साजरा केला जात आहे.
दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी गावात श्री भैरवनाथ जोगेश्वरी मातेची भव्य यात्रा भरते.
पिरंगुट गावातील सर्व ग्रामस्थ वर्षभर भक्तिभावाने मातेची पूजाअर्चा करतात व यात्रेच्या दिवशी विशेष धार्मिक विधी पार पडतात.
देवाचा मुखवटा परंपरा
देवाच मुखवटा वर्षभर पवळे आळीच्या मंदिरात सुरक्षित ठेवला जातो.
उत्सवाच्या वेळी गोळे आळी येथील रमण गोळे परिवार तसेच मुकाईवाडी येथील रामदास गोळे परिवार यांच्या हस्ते
या मुखवट्याची पालखीतून गावातून मिरवणूक काढली जाते.
ही पालखी मिरवणूक ग्रामदैवताचे दर्शन घडविण्याची विशेष परंपरा मानली जाते.
पहिला दिवस – धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम
उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री भैरवनाथ जोगेश्वरी मातेची महापूजा व अभिषेक करण्यात येतो.
देवास नैवेद्य, मानपान व नवस अर्पण केले जातात.
सायं. ८.३० वाजता पालखी मिरवणूक (छबिना) निघते आणि त्यानंतर
रात्रभर भजन व जागरण कार्यक्रम आयोजित केला जातो.
दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत पारंपरिक तमाशा सादर केला जातो.
दुसरा दिवस – कुस्तीचा जंगी आखाडा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पारंपरिक कुस्ती आखाड्याचे आयोजन केले जाते.
या कुस्ती आखाड्याला पंचक्रोशीतील पैलवान मोठ्या संख्येने सहभागी होतात.
हा कार्यक्रम गावातील युवकांसाठी प्रेरणादायी उत्सव ठरतो.
जुनी परंपरा आणि लोकपरंपरा
पूर्वीच्या काळात दसरा आणि दिवाळी दरम्यान
“भूत्या” म्हणून ओळखले जाणारे लोक गावातून फिरून तेल-धान्य गोळा करून
कुंभार समाजातील एका घरात मुक्कामी राहत असत —
ही परंपरा आजही पिरंगुटमध्ये सुरू आहे.
तसेच पूर्वी गोंडे समुदायातील लोक कोतवालासोबत भिक्षा मागत असत, आणि मातंग समाजाच्या घरात मुक्काम करीत असत. या परंपरा पिरंगुटच्या सामाजिक सहजीवनाचा भाग आहेत.
तसेच पूर्वी गोंडे समुदायातील लोक कोतवालासोबत भिक्षा मागत असत, आणि मातंग समाजाच्या घरात मुक्काम करीत असत. या परंपरा पिरंगुटच्या सामाजिक सहजीवनाचा भाग आहेत.
पिरंगुट गावातील इतर उत्सव
पिरंगुट गावात खालील सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात —

शिमगा (होळी)

नागपंचमी

दसरा

काकडा आरती

दिवाळी

रंगपंचमी

सप्ताह काला

