शिवकालीन मंदिरे

जय भवानी माता मंदिर, टेकडी

हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले असल्याचे उल्लेख आहेत. मातेची मूर्ती अत्यंत प्राचीन असून, मंदिर गावाच्या टेकडीवर उभे आहे. प्रत्येक नवरात्रोत्सवात येथे भजन, जागरण आणि सामुदायिक पूजा केली जाते.

खंडोबा मंदिर (शिवकालीन)

ग्रामसीमेवरील हे मंदिर खंडोबाचे प्राचीन स्थळ आहे. शिवकाळात या देवस्थानाला रणदेवतेचे स्थान मानले जात असे. प्रत्येक पौर्णिमेला विशेष पूजा आणि जत्रा भरते.

श्री जगदीश्वर महादेव मंदिर

हे मंदिर अत्यंत ऐतिहासिक आहे — छत्रपती शिवाजी महाराज रायगडाकडे जाताना येथे थांबले व अभिषेक केला होता, असा लोकपरंपरेतील उल्लेख आहे. श्री सरनौबत पिलाजी गोळे यांची समाधी येथेच आहे.