इतर प्राचीन व विशेष मंदिरे

विंजाई माता मंदिर (दरा)

हे मंदिर दरीच्या कडेला वसलेले असून येथे नेहमी पाण्याचा झरा असतो. विंजाई देवीच्या ठाण्याला भक्तांचा विशेष आदर आहे.

कमळजाई माता मंदिर व जुनी विहीर

मंदिराच्या शेजारील विहीर वर्षभर पाण्याने भरलेली असते, ही या ठिकाणाची अद्भुत गोष्ट आहे.

कानिफनाथ मंदिर

नाथ संप्रदायाशी संबंधित हे स्थान अध्यात्मिक साधनेसाठी ओळखले जाते. दरवर्षी पौर्णिमेला येथे आरती आणि भजन कार्यक्रम होतात.

धावजी पाटील मंदिर

स्थानिक वीर पुरुषांच्या स्मृतीला अर्पण केलेले हे मंदिर गावाच्या ऐतिहासिक परंपरेचा भाग आहे.

गोसावी बाबा मंदिर

ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र – दरवर्षी भंडारा आणि आरती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो.