लाभार्थी पात्रता
पिरंगुट ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी.
शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा किंवा शेतीचा पुरावा असणे आवश्यक.
ग्रामपंचायतीकडे कोणतीही थकबाकी नसावी (असल्यास प्रथम ती भरणे आवश्यक).
शेतकरी गट, बचत गट व कृषी उत्पादक संस्थांनाही लाभ घेता येईल.
अवजार मिळण्याची प्रक्रिया
ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे आवश्यक.
उपलब्धतेनुसार अवजारांचे वाटप "प्रथम अर्ज – प्रथम प्राधान्य" तत्त्वावर होईल.
अवजार घेताना नोंदवहीत सही करणे बंधनकारक राहील.
निश्चित कालावधीत अवजार परत करणे आवश्यक राहील.
शेतकऱ्यांची जबाबदारी
अवजारांचा योग्य व सुरक्षित वापर करणे.
अवजार खराब झाल्यास तत्काळ ग्रामपंचायतीला माहिती देणे.
जाणीवपूर्वक नुकसान झाल्यास दुरुस्तीचा खर्च संबंधित लाभार्थ्याने भरावा.
अवजार इतर व्यक्तीला परवानगीशिवाय देऊ नयेत.
हवामान बदल व कृषी अवजारांचा वापर
आज वाढते तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ व हवामान बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी अवजार बँकेतील साधनांचा वापर करून शेतकरी आधुनिक व हवामान-स्मार्ट शेती करू शकतात.




