मा. गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या पिरंगुट ग्रामपंचायतीला पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची, नागरिकाभिमुख उपक्रमांची तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुरू असलेल्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विविध विभागांचा आढावा घेत संबंधित अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.
दौऱ्यादरम्यान मा. गजानन पाटील यांनी स्थानिक शाळेला भेट देऊन शैक्षणिक सुविधा व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच महिला बचत गटांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या उपजीविका व आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत आवश्यक मार्गदर्शन करत विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या भेटीमुळे ग्रामविकास, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील कामांना अधिक बळकटी मिळाली.

