मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत समिती गठण व जबाबदारी वाटप

दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत पिरंगुट द्वितीय येथे आयोजित ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अभियानातील ७ प्रमुख घटकांनुसार विविध समित्यांची गठण करण्यात आली. ग्रामविकासाची कामे अधिक नियोजनबद्ध, पारदर्शक व लोकसहभागातून राबविण्यासाठी प्रत्येक समितीस स्वतंत्र जबाबदाऱ्या व कार्यवाटप करण्यात आले असून अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सक्रिय कार्यवाहीस सुरुवात करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी व संबंधित समिती सदस्यांना अभियानाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती देण्यात आली. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि शाश्वत विकास या विविध क्षेत्रांमध्ये समन्वय साधून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. समिती सदस्यांनी ग्रामविकासासाठी सक्रिय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.